नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतिपदी शिंदे गटाच्या दुधाळे येथील सदस्य माया ताराचंद माळसे तर उपसभापती पदी शीतल धर्मेंद्र परदेशी यांची निवड झाली असुन कॉग्रेसच्या सहकार्यांने नंदुरबार पं.स.वर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे.
नंदुरबार पंचायत समितीच्या सभापति व उपसभापती पदासाठी आज प.स.च्या स्व.हेमलता गावीत सभागृतात विषेश सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सकाळी ११ वाजेला अर्ज भरण्यास सुरूवात झाली.भाजपातर्फे सभापती पदासाठी मालतीबाई दिनेश गावीत यांनी अर्ज दाखल केला त्याला सुचक म्हणुन प्रकाश गावीत यांची स्वाक्षरी होती.तर उपसभापती पदासाठी करण रमण भिल यांनी अर्ज दाखल केला त्यांना सुचक म्हणुन मंगल विक्रम भिल यांची स्वाक्षरी होती.
तर शिंदे गटातुन सभापती पदासाठी माया ताराचंद माळसे यांनी अर्ज दाखल केला त्यांना सुचक म्हणुन अर्चना सुनिल वसावे यांची स्वाक्षरी होती तर उपसभापती पदासाठी शीतल धर्मेंद्र परदेशी यांनी अर्ज दाखल केला.त्यांना सुचक म्हणुन तेजमल पवार हे होते.दरम्यान शिंदे गटाच्या सभापती व उपसभापती पदाच्या उमदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते.सर्व उमेदवारांचे अर्ज छानणी अंती वैध ठरवण्यात आले.त्यांनतर ३ वाजेला तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली विषेश सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी हात उंचावुन मतदान घेण्यात आले.यावेळी शिंदे गटाच्या सभापती पदाच्या उमेदवार माया ताराचंद माळसे व उपसभापती पदाच्या उमेदवार शीतल धर्मेंद्र परदेशी यंाना ११ तर भाजपाच्या सभापती पदाच्या उमेदवार मालतीबाई दिनेश गावीत व उपसभापती पदाचे उमेदवार करण रमण भिल यांना प्रत्येकी ८ मते मिळाल्याने नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतिपदी शिंदे गटाच्या माया ताराचंद माळसे तर उपसभापती पदी शीतल धर्मेंद्र परदेशी हे विजयी झाले.तर एक सदस्य पवार छाया जिंतेंद्र या अनुपस्थीत होत्या.
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू प्रकाश गावित हे अडीच वर्षांपासून सभापती पदावर कार्यरत होते. दुधाळे ग्रामंपचायतीच्या निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या पुतणीचा पराभव पत्कारावा लागला होता. यात माळसे यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे सभापतिपदी माया ताराचंद माळसे यांची वर्णी लागली.
नंदुरबार पंचायत समितीत प्रचंड चुरस होती. गेल्या आठ दिवसांपासून दोन्ही गटांतील अर्थात भाजप, बाळासाहेबांची शिवसेना व कॉंग्रेसचे काही सदस्य हे सहलीवर गेले होते. २० सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक अर्थात ११ जागा मिळाल्या होत्या.
नंदुरबार पंचायत समितीच्या २० जागांसाठी जानेवारी २०२० ला झालेल्या निवडणुकीत भाजपाने ११ जागांवर, शिवसेनेने ५ जागांवर, कॉंग्रेसने ३ जागांवर तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. होळतर्फे हवेली गणातील अपक्ष उमेदवार दिपक मराठे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या ६ जागा होत्या.
दरम्यान ओबीसी आरक्षणामुळे नंदुरबार पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत गुजरभवाली, पातोंडा, होळतर्फे हवेली, नांदर्खे गण, गुजरजांभोली गणांमध्ये निवडणुक झाली. यात ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी नंदुरबार पंचायत समितीच्या पाच रिक्त जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत ५ पैकी ४ जागांवर शिवसेनेने विजय मिळविला होता भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले होतेे. या निवडणुकीत भाजपाला २ जागांचा फटका बसला होता तर शिवसेनेच्या २ जागा वाढल्या होत्या. सद्यस्थितीत पंचायत समितीत भाजपाचे ९, शिवसेनेचे ८ तर कॉंग्रेसचे ३ सदस्य आहेत.