Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कार जाहीर: तळोदा येथील गणेश मंडळाचा राज्यात १८ तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक

Mahesh Patil by Mahesh Patil
October 12, 2022
in राज्य
0
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पुरस्कार जाहीर: तळोदा येथील गणेश मंडळाचा राज्यात १८ तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक
नंदूरबार l प्रतिनिधी
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यात तळोदा येथील क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाने राज्यात १८ तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 

 

 

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

 

 

 

याशिवाय 27 जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

अ.क्रं जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव
1 अमरावती एकविरा गणेशोत्सव मंडळ
2 औरंगाबाद कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ
3 बीड जय किसान गणेश मित्र मंडळ
4 भंडारा आदर्श गणेश मंडळ
5 बुलढाणा सहकार्य गणेश मंडळ, तालुका चिखली
6 चंद्रपूर न्यु इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वार्ड
7 धुळे श्री. संत सावता गणेश मित्र मंडळ, सोनगीर
8 गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी
9 गोदिंया नवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी
10 हिंगोली श्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी
11 जळगांव जागृती मित्र मंडळ, भडगांव
12 जालना संत सावता गणेश मंडळ, परतूर
13 कोल्हापूर श्री. गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी
14 लातूर बाप्पा गणेश मंडळ
15 मुंबई शहर पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना.म.जोशी.मार्ग
16 नागपूर विजय बाल गणेशोत्सव मंडळ, किराडपुरा
17 नांदेड अपरंपार गणेश मंडळ
18 नंदुरबार क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ
19 नाशिक अमरज्योत मित्र मंडळ, सातपूर
20 उस्मानाबाद बाल हनुमान गणेश मंडळ
21 पालघर साईनाथ मित्र मंडळ, नालासोपारा
22 परभणी स्वराज्य गणेश मंडळ, देवनांदरा
23 पुणे जयजवान मित्र मंडळ, नानापेठ
24 रायगड संत रोहीदास तरुण विकास मंडळ, महाड
25 रत्नागिरी पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडणगड
26 सांगली तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा
27 सातारा सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली
28 सिंधुदुर्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवडा
29 सोलापूर श्रीमंत मानाचा कसबा गणपती
30 ठाणे धामणकर नाका मित्र मंडळ, भिवंडी
31 वर्धा बाल गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर
32 वाशिम मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ
33 यवतमाळ नवयुग गणेश मंडळ

 

 

 

 

 

गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्हयातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे.

 

 

 

 

राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्हयातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

होळ तर्फे हवेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभाबाई रवींद्र पवार बिनविरोध

Next Post

नंदूरबार जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी समीर माधवराव कुर्तकोटी यांची नियुक्ती

Next Post
नंदूरबार जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी समीर माधवराव कुर्तकोटी यांची नियुक्ती

नंदूरबार जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी समीर माधवराव कुर्तकोटी यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group