नंदुरबार l
तालुक्यातील नांदरखेडा गावाजवळील खडी क्रेशरजवळ उभे केलेले सुमारे साडे तीन लाख रुपये किंमतीचे टिप्पर पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथील रहिवासी असणारे विनोद हनुमान गवळी यांच्या मालकीचे टिप्पर (क्र. एम.एच.४३ वाय ७७४२) नांदरखेडा गावाजवळील केदारेश्वर खडी के्रशरच्या कच्चा रस्त्यावर उभे होते.
यादरम्यान, विनोद गवळी यांच्या पत्नीची प्रकृती बरी नसल्याने सुमारे २० ते २५ दिवस सदरचे टिप्पर रस्त्यालगत उभे असल्याने संधी साधून अज्ञात चोरट्याने पळवून नेले.याबाबत विनोद गवळी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. सुरेश वासावे करीत आहेत.