नंदुरबार | प्रतिनिधी
भिलीस्थान लायन सेनेने निवेदनाव्दारे मागणी केली आहे.यावेळी भिलीस्थान लायन सेनेतर्फे जिल्हधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात महिला बचत गटांना व महिला सक्षमीकरण करण्यासाठी शासन व बँकातर्फे योजना राबविल्या जातात परंतु फायनान्स कंपनी आदिवासी महिला बचत गटांना कर्जफेड केल्यावर ही नवीन हप्ता वसुली करीत आहेत तसेच महिला बचत गटांना धमक्या देत अपमानित करत आहेत.
तरी नंदुरबार जिल्ह्यातील फायनान्स कंपन्यांना नंदुरबार जिल्ह्यातून तडीपार कराव्यात व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज भिली स्थान लायन सेनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
जर या फायनान्स कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याच्या इशारा भिलीस्थान लायन सेनेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी भिलीस्थान लायन सेनेचे प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी, सुभाष नेरकर, हेमंत वळवी, बंटी नेतलेकर, कांतीलाल जाधव ,उदयसिंग पाडवी, राजेश वळवी, गायत्री गावित, कल्पना वळवी, सावंत पवार, श्रीराम वळवी, रोहिदास वळवी, सुशीला पवार व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








