नंदुरबार l
नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील वीज चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथील रमेश सुदाम पाटील याने घराच्या १० मीटर अंतरावर असलेल्या एल.टी. कंपनीच्या लाईनवर दोन आकडे टाकून ३ हजार १९० रुपये किंमतीची ५१ युनिटची केल्याचे आढळून आले.
याबाबत नंदुरबार ग्रामीण वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता प्रियंका राघु पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात रमेश पाटील याच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा कलम २००३ चे भादंवि कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








