नंदुरबार l प्रतिनिधी-
येथील विश्व हिंद धर्म सेवा संस्था आयोजित नंदुरबार गरबा नाईटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नवरात्रीच्या नऊ दिवस गरबा प्रेमींनी अक्षरशः धमाल करीत जल्लोष साजरा केला. ‘एक से एक बढकर’ गरब्याच्या थीमवर युवक युवतींचे नवचैतन्याने कार्यक्रमात बहर आली होती. यावेळी आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
नंदुरबार येथे विश्व हिंद धर्म सेवा संस्थे अंतर्गत ‘नंदुरबार गरबा नाईटस’चे दि. २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान नवापूर रस्त्यावरील वसईकर मार्केटमध्ये संस्थेचे अध्यक्ष कुणाल वसईकर, कार्याध्यक्ष कल्पेश जाधव, सचिव निवेदिता वसईकर यांनी आयोजन केले होते. उद्घाटन नगरसेविका संगिता वसईकर यांनी केले. यावेळी जन शिक्षण संस्थानं नंदुरबार १ च्या सदस्या कल्पना जाधव, जयश्री फिल्म प्रोडक्शन संचालिका जयश्री वसईकर, संगिता जाधव, विजया वसईकर,सुनंदा शेवाळे उपस्थित होते.
नवरात्र उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात आले. स्पर्धेत १३० जणांनी सहभाग नोंदवला त्यात ४५ जण विजेते ठरले.त्यांना शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह मोहिते. सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे, जयश्री फिल्मचे निर्माते तथा मूर्तिकार मनोज वसईकर,हिंदी मराठी फिल्म डायरेक्टर क्षमा कुणाल वसईकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरित केले तसेच सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
विश्व हिंद धर्मसेवा संस्था तर्फे आयोजित ‘नंदुरबार गरबा नाईटस’ च्या यशस्वितेसाठी मयुर बोरसे, दिलीप बैसाने, चेतना माळी, राखी सोहनी, भाग्यश्री सोहनी मयुर वसईकर,वैभव गवळे तसेच नृत्य प्रशिक्षक राहूल तिलंगे, ध्वनिक्षेपक व्यवस्थापक राजेश मच्छले या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.








