नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील एस.ए.एम. ट्रस्ट नंदुरबार, संचलित एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, प्राचार्य नूतनवर्षा वळवी, उपमुख्याध्यापक व्ही. आर. पवार , पर्यवेक्षक मिनल वळवी , पर्यवेक्षक सी.पी. बोरसे, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी मेजर ध्यानचंद यांचे जीवन परिचय देताना मृणाल राठोड आणि नंदिनी महिरे यांनी उत्कृष्ट भाषण दिले.शाळेचे क्रीडा शिक्षक खुशाल शर्मा यांनी प्रास्ताविक करतांना मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळास दिलेले त्यांचे योगदान सांगितले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व शाळेच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमानिमित्त मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शाळेतील शिक्षिकांकरीता बुक बॅलेंसिंग, ज्युनियर कॉलेज व दहावीच्या विद्यार्थिनी व विद्यार्थिनी करीता बकेट बोल, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्कल रिंग व इयत्ता आठवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी लिंबू चमचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करतांना जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी फीट इंडिया तसेच व्यायामा पासून शरीराला होणारे फायद्याचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष पाडवी यांनी केले, प्रास्ताविक खुशाल शर्मा यांनी केले तर आभार व्ही. आर. पवार यांनी मानले.