नंदुरबार l
तालुक्यातील भोणे ते दुधाळे रस्त्यावरील पाताळगंगा नदीच्या पात्रात पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन म्हशींना विद्युत धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील मनोहर प्रताप पाटील त्याच्या शेतात पाणी देण्यासाठंी पाताळगंगा नदीच्या पात्रात अनधिकृपपतणे इलेक्ट्रिक मोटार टाकली होती. यावेळी धनराज दला धनगर यांच्या मालकीच्या दोन म्हशी पाणी पिण्यासाठी गेल्या असता
नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे दोन्ही म्हशींचा मृत्यू झाल्याने २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबत वीज वितरण कंपनीचे राजीव गणेश रंजन यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात मनोहर पाटील याच्याविरोधात भारतीय विद्युत २००३ चे कलम १३८ व भादंवि कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सामुद्रे करीत आहेत.