नंदुरबार l प्रतिनिधी
जय भगवान महासंघ जिल्हा नंदुरबारच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबा यांची 125 वी .जयंती मातोश्री कॉम्पुटर सेंटर बाजार चौक रनाळे येथे साजरी करण्यात आली.
यावेळी भगवान बाबा व वंजारी समाजाचे लाडके दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार सुरेश शिंत्रे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी ग्रामीण भागात कीर्तन आणि प्रवचन ,शैक्षणिक,सामाजिक ,नैतिक , सांस्कृतिक प्रबोधन केले भक्तिमार्ग कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय लोकांपर्यंत साधला , कीर्तनकार म्हणून त्यांनी प्रचंड लोक प्रतिसाद मिळाला आपल्या कीर्तनातून त्यांनी जातिभेद ,धर्मभेद ,अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर प्रहार केला. प्रबोधन कार्यासाठी त्यांनी कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश मराठवाडा विदर्भ महाराष्ट्रात पिंजून काढला, विठूनामाचा प्रचार करताना त्यांनी समता बंधुता समानता एकता मानवता यांच्यासारखा आधुनिक विचारांचा प्रचार प्रसार केला, त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून भगवान बाबांची ओळख निर्माण झाली. असे माहिती श्री. शिंत्रे यांनी दिली, यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र चकोर यांनी भगवान बाबा याच्या कार्याची माहिती दिली .कार्यक्रमाला वंजारी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भाबड, बळीराम नागरे ,पांडुरंग गवते, मनोज गवते ,रवीद्र आव्हाड ,विजू कळकटे, हरी आव्हाड, शरद घुगे ,संपर्कप्रमुख योगेश गाभने , सहसंपर्कप्रमुख, हेमंत नागरे ,उपजिल्हाध्यक्ष प्रयोग आव्हाड ,युवाजिल्हाध्यक्ष नवनाथ नागरे ,युवाउपजिल्हा चेतन आव्हाड , ग्रामीण अध्यक्ष राहुल नागरे , ग्रा,उपाध्यक्ष चंद्रकांत कळकटे , विध्यार्थी अध्यक्ष गौरव शिंत्रे, उपाध्यक्ष प्रयाग काकड ,रोहित नागरे विनोद नागरे, रवी नागरे गौरव आव्हाड, विशाल भोई, भावेश गवते , गणेश नागरे यांच्यासह जय भगवान महासंघाचे रनाळे सह जिल्ह्यातील पदाधिकारी व सामाजिक ,राजकीय व सर्व समजतील नागरिकांनी उपस्थित होते.
भगवान बाबा यांच्या जयंती निमित्ताने जय भगवान महासंघाचे महेंद्र चकोर यांच्या अध्यक्षतेखाली भगवान बाबा जयंती निमित्ताने ग्रामीण रुग्णालय येथे फळ बिस्कीट वाटप व वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष महेंद्र चकोर यांनी तर सूत्रसंचालन गौरव शिंत्रे यांनी केले.