नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील विसरवाडी – नंदुरबार राज्य मार्गावर विसरवाडी येथे पूलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेने सायकलवरुन जाणाऱ्या १४ वर्षीय बालकाला रुग्णवाहिकेने
धडक दिल्याने घडलेल्या अपघातात बालक गंभीर जखमी झाला आहे. रुग्णवाहिकाचालक अपघात घडल्यानंतर घटना स्थळावरुन पसार झाला .
याबाबत अधिक माहिती अशी की,
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील मयूर जितेंद्र देवरे ( वय १४) रा.शनिमंदिर जवळ , कटारिया पार्क याला नंदुरबारहून गुजरातकडे जाणाऱ्या रूग्ण नसलेली इको रुग्णवाहिकेने जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले आहे . विसरवाडीच्या स्थानिक युवकांच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात त्याच रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पोचवले . प्राथमिक उपचार करून त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवले . त्याचे वडिल जितेंद्र देवरे हे दापूर अनुदानित आश्रम शाळेत शिक्षक आहे . पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी संपर्क करून पिंपळनेर चौफुलीवरील नवापूर पोलिस कर्मचारी ब्रम्हानंद जायभाये , विक्की वाघ , पंकज सूर्यवंशी , सुरेंद्र पवार यांच्या माध्यातून अपघातग्रस्त रुग्णवाहिकेला थांबवून नवापूर पोलिस ठाण्यात विचारपूस करून विसरवाडी पोलिसात पाठवले .