नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या १२१ जीर्ण इमारती पाडण्यास मंजुरी मिळाली असून बारा वर्ष धूळ खात असलेल्या प्रस्तावास प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या १२१ वर्गखोल्या, ६ इमारती, १ किचनशेड, इमारती ह्या पडक्या, जीर्ण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात झाला होता. त्यासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हा संघटक गणेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ. मनिषा खत्री, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे,माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू,
जि.प.अध्यक्षा अँड. सीमाताई वळवी, जि.प.उपाध्यक्ष अँड. राम रघुवंशी, शिक्षण सभापती अजित नाईक,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, प्रा. उपशिक्षणाधिकारी डाॅ. युनूस पठाण, प्रा. उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले होते. जुन्या शाळा इमारती निर्लेखन करावेत व शाळा खोल्यांची दुरूस्ती व नवीन खोल्या बांधण्यात याव्यात मागणी केली होती. त्यातील काही इमारती या कोसळल्या अवस्थेत होत्या.
काही जिल्हा परिषद शाळेच्या इमारतींना मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेल्या दिसून आल्या. सदर इमारती ह्या कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर जीर्ण झालेल्या इमारती अचानक कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली होती. शाळेच्या पडक्या इमारती पाडण्याबाबत बरेच वर्षापासून प्रस्ताव धूळखात पडला आहे . इमारतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे .
विद्यार्थी मधल्या सुटीत शालेय प्रांगणात खेळत असतात . त्यामुळे इमारत कोसळून विद्यार्थ्यांचा जीवीतीला धोकादायकच झाले होते. जि.प.शाळेची अवस्था सुस्थितीत नसल्यामुळे वर्गातील मुलांना पडलीच शिक्षण घ्यावे लागत होते. काही शाळेच्या प्रांगणात विटा पडलेल्या आहेत. तर काहींच्या इमारतींच्या भिंती कोसळल्या होत्या. कुठे पत्रे उडालेले होते. वर्गातील खोल्यांच्या छतावरील पत्रांची चाळण झाली होती. परंतु अनेक इमारती या कुडाच्या, कौलारू छताखाली विद्यार्थी,शिक्षक अध्ययन अध्यापन करतात. जीर्ण इमारतीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जि.प.बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता इंजिनिअर एस.डी.पवार, शिक्षण विभाग कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत, वरिष्ठ सहाय्यक सुभाष मारनर यांचे सहकार्य लाभले. प्रशासनाचे मनपूर्वक आभार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी मानले आहे.

अनेक ठिकाणी वाडी, वस्ती, पाड्यावरील वर्ग खोल्यांची जीर्ण अवस्थेत इमारती होत्या. अशा धोकादायक अवस्थेत शाळा भरली जात होती.विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळली. इमारत मंजुरी दिल्याबद्दल प्रशासनाचे मनपूर्वक आभार.
गोपाल गावीत , जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार








