नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलातर्फे आज दि.२७ ऑगस्ट रोजी प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. यात तीन पोलिस निरीक्षकांना पोलीस स्टेशनचा प्रभार देण्यात आला आहे. तर तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक व दोन पोलीस उपनिरीक्षक यांच्या ही नियुक्त्या करण्यात आल्या.
नव्यानेच तीन पोलीस निरीक्षक व दोन पोलीस उपनिरीक्षक यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली.आज दि. २७ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने आज ९ पोलीस अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांची प्रशासकीय कारणास्तव वाचक शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे . त्यांच्या जागी बदलीने जिल्ह्यात हजर झालेल्या किरणकुमार खेडकर यांची नंदुरबार शहर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तळोदा तळोदा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांची काल दि.२६ ऑगस्ट रोजी बदली झाली होती. त्यांच्या जागेवर पोलीस निरीक्षक पदी जिल्ह्यात नवीन हजर झालेले केलंसिंग पावरा, तर उपनगर पोलीस निरीक्षक पदाचा पदभार नरेंद्र भदाणे यांच्या कडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान शहादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांची प्रशासकीय बडली नवापूर येथे झाली आहे.त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांची बदली करण्यात आली.जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या
सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा अजितराव पवार यांची नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तर पोलीस उपनिरीक्षक राहुल शालिग्राम भदाणे यांची धडगाव पोलीस ठाण्यात तर तेथील पोलीस उपनिरीक्षक दिलीप काशिनाथ महाजन यांची अक्कलकुवा वाचक शाखेत बदली करण्यात आली.