Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे ग्रामपंचायतीमार्फत अधिकाधिक कामे सुरू करा : मनीषा खत्री

Mahesh Patil by Mahesh Patil
August 27, 2021
in राज्य
0
नूतन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पदभार स्विकारला
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक कामे सुरू करा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या, कमी पावसामुळे शेती उत्पादन कमी होण्याची शक्यता लक्षात घेता कामाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेल्फवरील कामे त्वरित सुरू करण्यात यावेत. ग्रामपंचायत ही सक्षम यंत्रणा असल्याने गावस्तरावर अधिक कामे घेणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या आवश्यकतेनुसार कामे त्वरित सुरू करावी. डोंगराळ भागात वन विभागाने नवीन कामे सुरू करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून घ्यावे.  काम वेळेवर उपलब्ध होईल असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण केल्यास गाव विकासाची चांगली कामे होण्यासोबत स्थलांतर रोखता येईल.
अधिकाऱ्यांनी दररोज शेल्फवरील कामांचा आढावा घ्यावा. 15सप्टेंबरपर्यंत कामे सुरू करण्याचे नियोजन करावे. सिंचन विहिरींची मंजूर कामे करण्यास संबंधित तयार नसल्यास त्याऐवजी गरजूंना अशी कामे देण्यात यावीत. शाळा-अंगणवाडी समोरील रस्ते, संरक्षक भिंत, खेळाचे मैदान, सार्वजनिक विहीर,  सपाटीकरण अशी उपयुक्त कामे घ्यावीत. पुढील वर्षांसाठी विहीर पुनर्भरण कामाचे नियोजन आतापासून करावे. अंगणवाड्याची अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावी. जलशक्ती अभियानांतर्गत शोषखड्ड्यांची कामे त्वरित पूर्ण करावी. शेततळे, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, कंपार्टमेंट बडींग, सीसीटी अशा उपयुक्त कामांचे नियोजन करावे. नेहमीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट कामांचे नियोजन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीस तहसिलदार, गट विकास अधिकारी, कृषि अधिकारी, वन आणि सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

Next Post

नंदुरबार जिल्हाअंतर्गत ९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तीन पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक बदलले

Next Post

नंदुरबार जिल्हाअंतर्गत ९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तीन पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक बदलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती निमित्त सप्ताहाचे सांगता

December 5, 2025
सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ

सारंगखेड्याचा चेतक महोत्सव ग्लोबल करण्यासाठी शासन पाठीशी:मंत्री जयकुमार रावळ

December 5, 2025
पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मानधनापासून वंचित, कामबंद आंदोलनाचा इशारा

December 5, 2025
नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील 18 जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी केले हद्दपार

November 24, 2025
भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ  शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

November 24, 2025
शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

November 24, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group