बोरद | वार्ताहर
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड कुमार शिराळकर यांना मोड ता.तळोदा येथील कॉम्रेड बीटीआर हायस्कूलमध्ये आपल्या आदिवासी पद्धतीप्रमाणे करण्यात आले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मार्क्सवादी विचारवंत काम्रेड कुमार शिराळकर यांचे काल दि.३ ऑक्टोंबर रोजी रात्री ८.३० वाजता .डॉ. कराड हॉस्पिटल नाशिक येथे निधन झाले. ते गेल्या २०१९ पासून कॅन्सर आजाराशी संघर्ष करत होते.
गेल्या एक महिन्यापासून पुणे, मुंबई व नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्याचा अंत्यविधी कॉम्रेड बीटी रणदिवे हायस्कूल, मोड, ता. तळोदा येथे ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सोमवारी आदिवासी पद्धतीप्रमाणे करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्युरिटी उदय नारकर यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.
याप्रसंगी जळगाव येथील प्रकाश चौधरी. पुणे येथील अजित अभ्यंकर.माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ऍड.सीमा वळवी, माजी आमदार उदयसिंग पाडवी. वाहरू सोनवणे, मिलिंद शिराळेकर,मोहन शेवाळे, ईश्वर पाटील, एल.आर.राव, डॉ.एल.कराड, मंगलसिंग चव्हाण,इंदिराबाई चव्हाण, डॉ.कुलकर्णी,ज्ञानेश्वर मोहे,श्यामसिंग पाडवी, गुलाबसिंग गिरासे,अनिल ठाकरे, नथू साळवे, जयसिंग माळी, सुबोध मोरे, विवेक मांटेरो मुंबई कॉम्रेड, आदींनी कुमार शिराळकर यांना श्रद्धांजली वाहिली
अध्यक्ष भाषणात उदय नारकर यांनी त्यांची जीवनशैली त्यांनी केलेल्या गोरगरीब जनते करता कार्य आणि स्वतःचा जीवनाची परवा न करता दिन दलितांकरता अहोरात्र केलेली मेहनत याबाबत माहिती दिली. कुमार शिराळकर हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे तसेच केंद्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते.
त्या ठिकाणी त्यांच्या कार्य उठावदार होते असे व्यक्तिमत्व आपल्यातून गेले याबाबत शोक व्यक्त करून दोन मिनिटात सर्वांनी शांत उभे राहून कुमार शिराळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच कॉम्रेड बी.टी.आर.हायस्कूल च्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्यावेळेस त्यांच्या समाधीवर ड्रोणद्वारे फुलांच्या वर्षाव करण्यात आला,








