नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार येथील तहसिल कार्यालयात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अभियानातर्ंगत संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत ४८७ प्रकरणांपैकी २४६ प्रकरणे मंजूर करण्यात आले तर १९७ ची पुर्तता करून ४४ प्रकरणे नामंजूर करण्यात आले.
नंदुरबार येथील तहसिल कार्यालयात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाडातर्ंगत विशेष सहाय योजनेतर्ंगत प्राप्त अर्जांवर निर्णय घेण्यासाठी तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखालील संजय गांधी अनुदान योजना समितीची बैठक झाली. महाईसेवा केंद्रामार्फत तहसिल कार्यालयाता प्राप्त झालेल्या अर्जांची शासन निर्णयानुसार पडताळणी करण्यात आली.
यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेत १६९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८३ मंजूर करण्यात आले. १३ नामंजूर करण्यात आले तर ७३ अर्जांची पुर्तता करण्यात आली. श्रावण सेवा राज्य निवृत्त योजनेत १५४ अर्ज प्राप्त झाले होते. पैकी ९२ मंजूर ४ नामंजूर तर ५८ अर्जांची पुर्तता करण्यात आली. इंदिरा राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्त वेतन योजनेचे ९४ अर्ज प्राप्त झाले होते.
पैकी ५० मंजूर, ८ नामंजूर तर ३६ अर्जांची पुर्तता करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजनेचे ६८ अर्ज प्राप्त झाले होते. पैकी १९ मंजूर, १९ नामंजूर तर ३० अर्जाच्या कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजनेचे दोन अर्ज प्राप्त झाले होते. त्यात दोघे अर्ज मंजूर करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत एकूण ४८७ अर्जांपैकी २४६ मंजूर करण्यात आले तर ४४ नामंजूर करत १९७ अर्जाचे पुर्तता करण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक नायब तहसिलदार नितीन पाटील यांनी केले.
बैठकीला नायब तहसिलदार भिमराव बोरसे आदी उपस्थित होते. तर अर्जाचा योजने निहाय वर्गवारी करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे यासाठी गणेश पाचोरे, प्रिती पाटील, श्रीमती मंगला वसावे, चेतन सोनार यांनी कामकाज पाहिले. तसेच ज्या लाभार्थ्यांचे कागदपत्रा अभावी अर्ज पुर्ततेवर आहे. अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यामार्फत कागदपत्रांची पुर्तता करून प्रकरण सादर करावे. असे आवाहन तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.








