नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील गुजरात राज्याला जोडणाऱ्या पूल दुर्घटनाप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी केली आहे.
नंदुरबार तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्ग ६ वरील धानोरा गावाजवळील पुल कोसळल्याची घटना घडली होती. जिल्ह्यातील धोकेदायक पुलांचा प्रश्न पुन्हा समोर आले आहेत, जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचे समोर आले होते, या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांनी धानोरा पुलाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.








