शहादा l
येथील पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्ताने ‘गांधी भजनावली’ कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिपक पाटील हे होते.याप्रसंगी संस्थेच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील, संचालक दिपक पटेल, मयूर पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, प्राचार्य बी. के. सोनी, प्राचार्य डॉ. एन. जे. पारील, प्राचार्य डॉ.प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ. डी.एम. पाटील, प्राचार्य डॉ. एस. पी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात दिपक पाटील यांनी गांधी विचारांचे महत्त्व सांगितले. महात्मा गांधी सभागृहात गांधी भजनावली कार्यक्रम सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा. डॉ. सतिष भांडे व विद्यार्थ्यांनी सादर केला. या कार्यक्रमात चेतन शिंदे, राजेश्वरी जाधव, ओम पाटील, धनंजय करंजे, मिहिर सोनवणे, अवंतिका पवार, सरगम भारती, मंजिरी निझरे, वैष्णवी चौहान या विद्यार्थी कलावंतांनी सहभाग दिला.
हार्मोनियम-गिरीश पांचाल, तबला- प्रथमेश महाजन, लौकीक ठाकुर यांनी सहभाग दिला. भजनावली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिव्या पाटील या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमात ओम तत् सत् श्री नारायण तु ,कृपालु भजमन, वैष्णव जन तो तेने कहीये जे, तेरे चरणों मे , श्री रामचंद्र चारों धाम, हे राम हे राम, रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम या भजनांचा समावेश होता.उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ. यशवंत शिरसाठ यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमास प्राधापक व विद्यार्थी उपस्थित होते.








