नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील महामार्गावरील सावरट ते रायंगण गावादरम्यान भरधाव ट्राला रस्ता दुभाजकाला धडकल्याने गेल्याने सळई ट्रकच्या केबिनमध्ये घुसून बाहेर आले. पाइपमध्ये दबला गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यातील महामार्गावरील सावरट ते रायंगण गावादरम्यान रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून सुरतकडे जाणारा ट्राला (क्रमांक जीजे १० टीएक्स १६८५) भरधाव जात होता.
दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्राला थेट दुभाजकावर जाऊन आदळला. त्यामुळे त्यात ठेवलेले लोखंडी सळई केबिन फोडून पुढे निघाले. त्यात चालक सुनीलकुमार विमल पासवान (४७) रा. भिलाई, जि.दुर्ग (छत्तीसगड) दबला गेला. चालकाने सळईखालून निघण्यासाठी धडपड केली. मदत करणाऱ्यांनीही प्रयत्न केले,
परंतु पाइप वजनदार असल्याने चालकाला काढता आले नाही. त्यामुळे काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात ट्राला चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी नवापूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.








