नंदुरबार | प्रतिनिधी
मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणार्या जळगाव येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरण बकाले यांना कायमस्वरूपी सेवेतून निलंबित करण्यात यावे यासाठी नंदुरबार येथील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय नितीन जगताप यांनी नंदुरबार येथील अंधारे चौकात परिवारासह उपोषणाला बसले आहेत.
उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. जळगाव येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक बकाले यांनी काही दिवसापूर्वी मराठा समाजाबद्दल तीव्र अश्लील शब्दात बेताल वक्तव्य केले होते. याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आले आहे. परंतु त्यांचे कायमस्वरूपी निलंबन व्हावे अशी मागणी नंदुरबार मध्ये करण्यात आली आहे. यावेळी मराठा समाजाचे नितीन जगताप यांच्यासह पूर्ण परिवार व मराठा समाज बांधवांनी तीव्र निषेध करून उपोषण सुरू केले आहे.
पोलिस निरीक्षक बकाले यांचे कायमस्वरूपी निलंबन होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा श्री जगताप यांनी घेतला आहे. यावेळी उपोषणाला मराठा समाज बांधवांनी आणि सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थिती लावून तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. या उपोषणावेळी नंदुरबार शहर पोलीसांमार्फत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


राष्ट्रवादीचा पाठिंबा
जळगाव येथील पोलिस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अपमानास्पद शब्द वापरला होता त्याचा निषेध म्हणून व त्याला बडतर्फ करावे म्हणून मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समन्वयक नितीन जगताप व सहपरिवार सह नंदुरबार येथे उपोषणाला बसले आहेत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हा यांच्यातर्फे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी जाहीर पाठिंबा देत घडलेल्या प्रकरणाबाबत निषेध व्यक्त केला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाविस्कर, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील,शहादा शहराध्यक्ष सुरेद्र कुंवर, तालुकाध्यक्ष माधवराव पाटील,जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी,सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,असलोद उपसरपंच दिपक राजपूत धनराज बच्छाव,मोतीराम पाटील,आदी उपस्थित होते. तसेच या उपोषणकर्त्यांना विविध संघटनांनी पाठिंबाला दर्शविला असून यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राहू मोरे यांनीही उपोषणावेळी उपस्थित लावुन पाठिंबाला दर्शविला आहे.








