नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत अभियान सुरु आहे. यानिमित्त शुक्रवारी शहरातून प्रबोधन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .नंदुरबार जिल्हा रुग्णालयात महीलांची व बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .नंदुरबार शहरात जिल्हा रुग्णालयातर्फे माता सुरक्षीत तर पर सुरक्षीत सप्ताहनिमील भव्य प्रभातफेरी प्रसंगी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर प्रभातफेरीस नंदुरबारच्या खासदार .डॉ. हिना गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन नेहरु पुतळा येथून सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी डॉ.सुप्रिया गावित, जिल्हा रुग्णालय जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, डॉ.पाटील अती.जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच अती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. के.डी.सातपुते, शल्यचिकीत्सक डॉ .राजेश वसावे ,डॉ .सुलोचना बागुल, डॉ नितीन पाडवी, डॉ कल्पेश चव्हाण, सह्याक अधीसेविका शैलजा मोरे ,प्राचार्य. जितेंद्र चव्हाण, जिल्हा कार्यक्रम अधिकाारी नितीन मंडलीक, मनोज चौधरी, भुषण पाटील, भूषण बोरसे व नंदुरबार शहरातील विविध विद्ययालयातील प्राध्यापक, शिक्षक, विदयार्थी हे मोठया संख्येने उपस्थित होते.








