नंदुरबार l
पुणे येथील ख्यातनाम संस्था पुणे इंटर नॅशनल सेंटर व ‘ग्यान-की’ यांच्यावतीने आयोजित ‘आजीच्या पोतडीतील प्रेरणादाई गोष्ट’ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन कथाकथन स्पर्धा झाली. यावेळी चुरशीच्या स्तरावर मंदार गणेश पाटील याने द्वितीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत राज्यभरातून ४६३० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. मंदार पाटील यास सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तीन हजार रुपये रक्कम, पुणे येथे दोन जणांचा प्रवास खर्च तसेच पुणे परिसराीतल एक दिवशीय सहल पारितोषीक स्वरुपात प्राप्त झाली.
यशदा संस्थेच्या सभागृहात बक्षिस समारंभ पार पडला. त्यात शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन मुकूल तसेच प्रदीप लोखंडे या मान्यवरांच्या हस्ते मंदार पाटील याचा सन्मान करण्यात आला. मंदार पाटील हा येथील स्वा.सै.गोकुळदास देसाई प्राथमिक विद्या मंदिर येथील इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ऍड.रमणभाई शाह, सचिव डॉ.योगेश देसाई, मुख्याध्यापिका सुषमा शाह, मिनाक्षी भदाणे, भद्रेश त्रिवेदी आदींनी अभिनंदन केले आहे. अनघा जोशी यांचे मंदार पाटीलला मार्गदर्शन लाभले.








