नंदुरबार l
येथील लायन्स क्लब, लायन्स फेमिना क्लब ,स्मित हॉस्पिटल व नंदुरबार जिल्हा पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खोडाईमाता यात्रेत येणाऱ्या भाविकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते झाले. हे शिबिर विजयादशमी पर्यंत सुरू राहणार आहे.
या प्रसंगी स्मित हॉस्पिटल प्रमुख डॉ.तेजल चौधरी,लायन्स क्लब अध्यक्ष सतीश चौधरी,लायन्स फेमिना अध्यक्षा शीतल चौधरी,डी.वाय.एस.पी.प्रधान, शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर वाहतूक निरीक्षक सुनील नंदवाळकर,पोलीस निरीक्षक भावसार आदी उपस्थित होते.
या शिबिरात भाविकांची मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे.तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनस्थळी जाण्याकरता व्हील चेअर,वॉकर, प्रथमोपचार,गरज लागल्यास रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे.
भाविकांचे आरोग्य जपण्याच्या या उपक्रमाचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी कौतुक केले व शिबिरास शुभेच्छा दिल्यात.या प्रसंग डॉ.सी.डी.महाजन, डॉ.जयंत शाह,डॉ.विजय पटेल,समीर शहा,अनिल पाटील, आनंद रघुवंशी,श्रीराम दाऊदखाने,श्रीराम मोडक,शेखर कोतवाल,डॉ.प्रसाद सोनार, डॉ.प्रदीप सोनार, निलेश तवर,सुप्रीया कोतवाल,अपर्णा पाटील,कांचन मुलानी,चेतना शाह उपस्थित होते. लायन्स क्लब सचिव उध्दव तांबोळी फेमिना क्लब सचिव मीनल म्हसावदकर यांनी क्लब सदस्यांच्या वतीने शिबिराचे यशस्वी संयोजन केले.