Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खोडाई देवी यात्रोत्सवासह हजरत पैगंबर जयंती मिरवणुकीत आरोग्य पथक नियुक्त करा

team by team
September 26, 2022
in राजकीय
0
खोडाई देवी यात्रोत्सवासह हजरत पैगंबर जयंती मिरवणुकीत आरोग्य पथक नियुक्त करा

नंदुरबार  l

नवरात्रोत्सवानिमित्त खोडाई देवीचा यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. तसेच जगाला शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीनिमित्त 9 ऑक्टोंबरला मिरवणुक काढण्यात येणार आहे. म्हणुन या सण-उत्सवात 108, 102 या रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी व औषधींसह उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत सदर सण-उत्सवाच्या काळात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन देेण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी जारी केले.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार येथील ग्रामदैवत खोडाई देवीच्या यात्रेला नवरात्रोत्सवानिमित्त सुरुवात झाली आहे. दि.26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2022 पर्यंत खोडाई देवी यात्रा भरणार असून आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने यात्रास्थळी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक व 108, 102 या रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच आरोग्य जनजागृती देखील करण्यात यावी.

यात्रोत्सवाच्या काळात खोडाई देवी मंदिरासह परिसरातील वीज पुरवठा नियमितपणे सुरळीत ठेवण्यात यावा. त्याचबरोबर जगाचा शांतीचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीनिमित्त दि.9 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता नंदुरबार येथील जामा मस्जिद येथुन हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांच्या जयंतीची मिरवणुक सालाबादप्रमाणे काढण्यात येणार आहे.

या मिरवणुकीवेळी देखील 108 व 102 असलेल्या रुग्णवाहिकांसह वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, मोहन श्रॉफ, तनवीर अहेमद, अरशद सैय्यद, मुक्तार सैय्यद आदींनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एकलव्य आदिवासी क्रांतीदल संघटनेचे ४ ग्रा.पं.वर वर्चस्व तर ४३ सदस्य विजयी

Next Post

माळीवाडा परिसरात ११३ पशुंना लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण

Next Post
माळीवाडा परिसरात ११३ पशुंना लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण

माळीवाडा परिसरात ११३ पशुंना लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add