Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासातच उघड, एकास अटक

team by team
September 26, 2022
in क्राईम
0
नवापूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासातच उघड, एकास अटक
नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासातच उघड करून 37हजाराचा मल हस्तगत करून एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.18 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 12:30 वाजता नवापूर शहरातील अभय मोहीत हे जेवण करुन त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा बंद करुन झोपुन गेले होते. सकाळी ते नेहमीप्रमाणे 6:30 वाजेचे सुमारास झोपेतून उठले, तेव्हा त्यांना त्यांच्या घरातील पलंगावर व कपाटावर ठेवलेले 37 हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल त्यांच्या राहत्या घराचे मागील बाजूस असलेला दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले.
तसेच त्यांचे 2 मोबाईल घरात नसल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांची चोरी झाल्याची खात्री झाली त्यांनंतर अभय राजु मोहीते रा.देवळफळी, नवापुर यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 457,380 प्रमाणे अज्ञात आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले.
नवापूर पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत माहीती मिळविली की,सदरची घरफोडी ही देवळफळी परिसरात राहणारा मोहीन आलवाला याने केलेली आहे.
त्यामुळे त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सदर माहिती कळवून संशयीत आरोपी मोहीन आलवाला यास ताब्यात घेवून माहितीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले. नवापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांनी देवळफळी परिसरात साध्या वेशात जावून सापळा रचून मोहन सलीम आलवाला यास अटक करून अभय मोहीते यांचे घरातील चोरी झालेल्या दोन मोबाइल बाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देवू लागला
नंतर त्यास नवापूर पोलीस ठाणे येथे आणून पुन्हा विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून गुन्ह्यातील 37 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मालमत्तेविरुध्दचा गंभीर गुन्हा अवघ्या 24 तासात उघड करुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला म्हणून पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील,नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पोलीस हवालदार दादाभाई वाघ, पोलीस नाईक नितीन नाईक, विनोद पराडके पोलीस कॉन्सटेबल संदिप सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Next Post

खोडाई माता यात्रौत्सवा दरम्यान या ठिकाणी वाहने लावण्यास बंदी

Next Post
250 वर्षांची परंपरा असलेल्या खोडाईमाता यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ

खोडाई माता यात्रौत्सवा दरम्यान या ठिकाणी वाहने लावण्यास बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add