Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खोडाई माता यात्रौत्सवा दरम्यान या ठिकाणी वाहने लावण्यास बंदी

team by team
September 26, 2022
in क्राईम
0
250 वर्षांची परंपरा असलेल्या खोडाईमाता यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ
नंदूरबार l प्रतिनिधी
  26 सप्टेंबर 2022 ते  5 ऑक्टोंबर 2022 रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रौत्सव अनुषंगाने नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर येथे यात्रौत्सव भरवण्यात येत असतो. यात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिराचे परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात,
यात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिरात व यात्रेत वयोवृध्द व्यक्ती, स्त्रिया, पुरुष, लहान मुले-मुली इत्यादी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. तसेच बाहेर गावाहून दुचाकी, चारचाकी वाहनांवर आलेल्या भाविकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्याचप्रकारे मंदिराचे परिसरात विविध खेळण्यांचे दुकान, खाण्याचे हॉटेल, स्टॉल, मनोरंजनाचे पाळणे इतर दुकाने असतात.
यात्रोत्सव दरम्यान आलेले भाविक त्यांची दुचाकी, चारचाकी मंदिराचे परिसरात लावल्यामुळे भाविकांची गैरसोय होवून त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो ही बाब लक्षात घेवून  जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर यात्रौत्सवात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. तसेच याबाबतचे स्वतंत्र आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्गमित केलेले आहेत.
 नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिर परिसरात  5 ऑक्टोंबर दरम्यान दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरात त्यांचे दुचाकी व चारचाकी तसेच इतर वाहने जगतापवाडी चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती मेन गेट, डी. आर. हायस्कुल ते संतोषी माता मंदिर या मुख्य रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी चारचाकी वाहने पार्किंग करण्यास बंदी करण्यात आलेली आहे.
खोडाई माता यात्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी त्यांची वाहने भामरे क्लासेस जवळ, GTP महाविद्यालय मैदान, डॉ. राजकुमार पाटील यांचे दवाखान्याचे पूर्वकडील ठिकाणी, BSNL कार्यालयाचे समोर याठिकाणी पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच भाविकांनी त्यांची वाहने मंदिर परिसरात रस्त्यांवर किंवा इतरत्र पार्किंग केल्यास सदर वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासातच उघड, एकास अटक

Next Post

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार

Next Post
गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातमध्ये जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add