Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

22 वर्षीय युवतीचा निर्घृण खून, नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

team by team
August 27, 2021
in क्राईम
0
22 वर्षीय युवतीचा निर्घृण खून, नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरालगत असलेल्या बिलाडी ते नारायणपूर रस्त्यावरील एका शेतात एका २२ वर्षीय युवतीचा निर्घृण खून झाला असून तिचा मृतदेह छिन्नविच्छीन अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील बिलाडी- नारायणपुर रस्त्यावर असलेल्या एका शेताजवळ रेल्वे रूळाच्या पाच मिटर अंतरावर एका युवतीचा खून करून त्याठिकाणी मृतदेह फेकून दिल्याचे आढळून आले. याबाबत शेतमालकाने याची खबर पोलीसांना दिली. या माहितीवरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या २२ वर्षीय युवतीचे धडापासून शिर १५ फुट अंतरावर आढळून आले. तसेच तिचा हातही कापलेला आढळला.

ही माहिती मिळताच नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अज्ञात कारणाने धारदार शस्त्राने सदर युवतीचा निर्घुण खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मृतदेह आढळल्याची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलीस दलाने घटनास्थळी श्‍वान पथकाला पाचारण केले. श्‍वानने धानोरा रस्त्यावरील पुलापर्यंत माग काढला. यावेळी फॉरेन्सींग लॅबमध्ये विविध नमुने पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरूध्द भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले करीत आहेत.
दरम्यान, नंदुरबार शहरात पोलीसांनी तपास केला असता परिसरात कुठलीही युवती हरविल्याची माहिती त्यांना उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सदर युवती कोण, तीचा खून कोणत्या कारणाने झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथील तरूणांचा कोकण पूरग्रस्तांना मदतीचा हात

Next Post

ग्राहकांची विजबिले रस्त्यावर टांगून झटकली जबाबदारी, वीज ग्राहकांची सेवा थांबली अर्ध्यावरच

Next Post
ग्राहकांची विजबिले रस्त्यावर टांगून झटकली जबाबदारी, वीज ग्राहकांची सेवा थांबली अर्ध्यावरच

ग्राहकांची विजबिले रस्त्यावर टांगून झटकली जबाबदारी, वीज ग्राहकांची सेवा थांबली अर्ध्यावरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add