Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

ग्राहकांची विजबिले रस्त्यावर टांगून झटकली जबाबदारी, वीज ग्राहकांची सेवा थांबली अर्ध्यावरच

Mahesh Patil by Mahesh Patil
August 27, 2021
in सामाजिक
0
ग्राहकांची विजबिले रस्त्यावर टांगून झटकली जबाबदारी, वीज ग्राहकांची सेवा थांबली अर्ध्यावरच
मोलगी l प्रतिनिधी
 सुरळीत वीज पुरवठा करण्यासह वीज शुल्काची बिले ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही वीज वितरणाची आहे. परंतु काठी ता. अक्कलकुवा भागातील ग्राहकांच्या नावाची वीजबिले रस्त्यावर टांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला आहे.
     चुकीची वीजबिले, खंडीत वीज पुरवठा यासह वीज वितरणच्या काही सेवेबद्दल ग्राहकांमध्ये नेहमीचीच नाराजी आहे. असे असतानाच काठी ता. अक्कलकुवा भागातील ग्राहकांना वीज वापराच्या शुल्कापोटी   काढलेली बिले काठी येथील गॅरेजसमोर रस्त्यावर एकाच ठिकाणी टांगण्यात आली आहे. थकबाकीने वीज पुरवठा खंडीत होणे व विलंब शुल्क टाळण्यासाठी ही बिले तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना बिले बेवारस सोडून संबंधित विभागाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ग्राहकांमधील नाराजी संतापात बदलली आहे.
वीज वितरणाच्या अशा या कारनामांमुळेच ग्राहकांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. वीज पुरवठा खंडीत करण्याच्या कारणांवरुन मागे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांने ग्राहकांनी त्या-त्या वेळी बिले भरल्यास अशी समस्या निर्माण होणार नाही, असे सुतोवाच दिले होते. परंतु वीज वितरणाच्या अशा या भुमिकेमुळे ग्राहकांनी नेमके  करावे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काठीत पडून राहिलेल्या वीजबिलांमुळे अनेक ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली असून असा प्रकार पुन्हा दिसून आल्यास ग्राहक रस्त्यावर उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.
         ग्राहकांमध्ये वाढता असंतोष
वीजबिलांवरच बिल भरण्याचा कालावधी दिला जातो. त्या कालावधीत बिल न भरल्यास विलंब शुल्क आकारले जाते. बिल न भरल्यास वीज पुरवठाच खंडीत करण्यात येते. ही बाब नियमिततेसाठी योग्यच आहे, परंतु वीज वितरणाच्याच अशा कारनाम्यांना काय म्हणावे असा संतप्त सवाल ही उपस्थित होत आहे.
बिल न भरल्यास ग्राहकांची चुकी म्हणून त्यांची अडवणूक होते, ती एकप्रकारे शिक्षाच ठरते. आता या प्रकारात वीज वितरणाचीच चुक दिसते. याची शिक्षा कोणाला द्यावी असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
– रविंद्र वळवी,
बातमी शेअर करा
Previous Post

22 वर्षीय युवतीचा निर्घृण खून, नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

चिनोदा गावात बिबट्याचा मुक्त संचार ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

चिनोदा गावात बिबट्याचा मुक्त संचार ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री , अल्प परिचय

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री , अल्प परिचय

June 30, 2022
लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

June 30, 2022
नंदुरबारच्या आजारी पोलीसांना पोलीस अधीक्षकांनी पाठवले महिन्याचे राशन

नंदुरबारच्या आजारी पोलीसांना पोलीस अधीक्षकांनी पाठवले महिन्याचे राशन

June 30, 2022
मराठा क्रांती मोर्चातर्फे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर जल्लोष

मराठा क्रांती मोर्चातर्फे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर जल्लोष

June 30, 2022
शहादा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष ‌

शहादा येथे भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष ‌

June 30, 2022
अक्कलकुवा येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडीओ प्रसारित करणार्‍या इसमाला अटक

अक्कलकुवा येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडीओ प्रसारित करणार्‍या इसमाला अटक

June 30, 2022

एकूण वाचक

  • 1,685,244 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group