नवापूर ।
नवापूर तालुक्यातील ढोंगसागाळी गावात आदिवासी विकास विभागातर्फे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार द्वारा शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तालुकास्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार प्रकल्पाधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ढोंगसागाळी सरपंच संजय कांबळे होते.
प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी विजय सोनार, प्रकाश वसावे ,सुनिल पाटील शासकीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रावसाहेब चव्हाण,माजी सरपंच शांताराम कोकणी,उपसरपंच संगिता कोकणी आदी उपस्थित होते.
१५ शासकीय आश्रम शाळा १२ अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ढोंगसागाळी येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समयी खेळाडूंनी मशाल घेऊन प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल यांनी उद्घाटन केले.
क्रीडा स्पर्धेत खो खो, हॉलीबॉल, कबड्डी,हँडबॉल १ वैयक्तिक खेळासाठी लांब उडी ,उंच उडी गोळाफेक थाडीफेक भाला फेक रेले धावणे आदी स्पर्धा घेण्यात येत आहे.
आज गुरुवार रोजी 14वर्ष वयोगट व 19 वर्ष वयोगटाची सामने घेण्यात आले.सांघिक व मैदानी सामने देखील होणार झाले. शुक्रवारी 17 वर्ष वयोगट व वैयक्तिक सामने रंगणार आहेत. येथील विजेते संघाचे प्रकल्प स्तरावर निवड करून तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.बी. बोरसे , क्रिडा मार्गदर्शक टी.के.कोकणी ,क्रिडा शिक्षक वनसिंग वसावे व आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








