नंदुरबार l
येथील श्रीमती डी आर हायस्कूलचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी मयूर योगेश गवते याने नुकत्याच ऑनलाइन संपन्न झालेल्या नंदुरबार जिल्हा विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात गणितीय प्रयोगशाळा हे उपकरण मांडले होते. या उपकरणास नंदुरबार जिल्हा प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक चा पुरस्कार प्राप्त झाला असून आता त्याचे उपकरण महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवडले गेले आहे. मयूरला त्याचे गणित शिक्षक योगेश गवते यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर राज्य विज्ञान प्रदर्शन २२ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्य विज्ञान संस्था रवीनगर नागपूर यांच्या अंतर्गत ऑनलाइन स्वरूपात संपन्न होणार आहे. अतिशय कमी वयात मयूरने संपादन केलेले या यशाबद्दल नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ऍड.परीक्षित मोडक, अध्यक्ष नरेंद्रभाई सराफ, उपाध्यक्ष राहुल पाठक, सचिव प्रशांत पाठक, शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व राज्य विज्ञान प्रदर्शनात सुद्धा त्याने यश मिळावे यासाठी त्यास शुभेच्छा दिल्यात.








