नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी जिल्हा बैठकीचे आयोजन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर तर प्रमुख उपस्थिती नंदुरबार जिल्हा सरचिटणीस राम साळुंके, आरपीआय जिल्हा नेते बापू महिरे सुलतान पिंजारी प्रवीण वाघ आणि मान्यवर उपस्थित होते.

सदर बैठकीत पक्षाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत नंदुरबार शहर व जिल्हाभरातील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ येथे होणार्या रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात नंदुरबार जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे याबद्दल मार्गदर्शन केले.
सदर बैठकीत रिपब्लिकन पक्षाच्या तालुका अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी पदाधिकार्यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी सचिन पिंपळे, विजय पानपाटील, दीपक अहिरे, गणेश पवार, संदीप शिंपी भुर्याभाऊ सामुद्रे, रतिलाल ईशी, भीमराव बिरारी, प्रकाश सामुद्रे, राहुल शिरसाट, प्रवीण तिरमली भिकलाल ढोडरे आदींची पक्षाच्या विविध पदांवरती नियुक्ती करण्यात आली. यावेळी बैठकीस इब्राहिम शेख, ऍड. तुकाराम चित्ते, सागर जाधव, राजेंद्र पानपाटील, सागर मंगळे, शुभम पानपाटील, सुमेध चित्ते, दर्शन चौधरी, कमलेश जाधव, दीपक जाधव, संजय पानपाटील, युसुफ शब्बीर पिंजारी, विनोद सामुद्रे, मिथुन श्रॉफ अजित कुलकर्णी अशोक पाडवी, सचिन सामुद्रे, शुभम बागले, तेजस भिल, पावबा भिल, सुरज भील,हितेश कापुरे, रोहित पिंपळे, रणजीत कोतक, भीमराव पिंपळे, आप्पा सामुद्रे, नितेशकुमार ईशी, हेमंत मोरे, विशाल सामुद्रे, फत्तु पाडवी, सुजित माने, गुलाब प्रताप पवार आदिलशहा शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.








