नंदुरबार l
येथील राजस्थानी ब्राह्मण समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष अनिल सोहनलाल शर्मा यांची बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उदय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कार्यकारिणी बैठक पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा होवून अनिल शर्मा यांच्या समाजकार्याची दखल घेत सर्वानुमते त्यांची बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बैठकीत निर्मल शर्मा, राकेश शर्मा, जितेंद्र दीक्षित, राजेश त्रिवेदी, अविनाश त्रिवेदी, जयंत वैद्य, भिकू त्रिवेदी शरद जोशी आदी उपस्थित होते. अनिल शर्मा यांच्या निवडीचे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे








