नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अक्कलकुवा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात विधानपरिषदेचे आ. आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वडफळी येथील ॲड.दीपक वळवी, मिथुन वसावे,सुरेश वसावे, साजन वसावे, रोहिदास वसावे यांच्या सह असंख्य काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश दिला.
यावेळी जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, तालुका प्रमुख मगन वसावे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ललित जाट,युवा सेनेचे जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, विधानसभा महिला आघाडी प्रमुख संगीता पंजराळे,युवती सेना उप जिल्हाप्रमुख सरला पाडवी,महिला आघाडीच्या तालुका संघटक सिंधु वसावे,तालुका उप प्रमुख तुकाराम वळवी,शहर प्रमुख रावेंद्र चंदेल,जगदीश चित्रकथी, कान्हा नाईक,विनोद वळवी, राजेंद्र वसावे,आनंद वसावे,छोटुलाल पाडवी,कुलदीप टाक, छाया वळवी आदीं उपस्थित होते.








