नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर शहरात तलवार आढळल्याने एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील श्रीराम मंदिराचा परिसरात जयेश सुरेश पाटील हा गैरकायद्याने विनापरवाना टोकदार तलवार कब्जात बाळगतांना आढळून आल्याने पोहेकॉ दादाभाई वाघ यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात जयेश सुरेश पाटील रा.दगडीचाळ (नवापूर) याच्या विरूध्द भारतीय हत्यार कलम ४/ २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई अशोक मोकळ करीत आहेत.








