नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील नागरिकांच्या कच्च्या अनुज्ञप्तीची विधीग्राह्यता संपुष्टात येत असल्याने कोरोना परिस्थितीचा विचार अनुज्ञप्तीधारकांची गैरसोय टाळण्यासाठी सप्टेंबर 2021 मध्ये पक्की अनुज्ञप्ती करण्यासाठी तालुकास्तरावर मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शहादा येथे 7,14,21 व 28 सप्टेंबर रोजी, नवापूर येथे 8 व 22 सप्टेंबर, तळोदा 3 व 7 सप्टेंबर तर अक्राणी-धडगांव येथे 29 व 30 सप्टेंबर 2021 रोजी मासिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीची चाचणी ही त्या तालुक्यातील लोकांसाठी निश्चित केलेल्या संख्येप्रमाणे घेण्यात येणार आहे. यावेळी अपूर्ण अर्ज स्विकारण्यात येणार नाही. ऐनवेळी एखाद्या तारखेस सुट्टी जाहीर झाल्यास सदर दौरा दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणी वेळी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.
तरी सर्व मोटार वाहन मालक, चालक व अनुज्ञप्ती धारकांनी पक्की अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन वेळ घेऊन मासिक दौऱ्याच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी केले आहे.