नवापूर | प्रतिनिधी
भोंनआमळा ता. नवापूर येथे वनविभागाने बेवारसपणे उभ्या असलेल्या ट्रक पकडला असुन वाहनासह साडे पाच लाखांचें अवैध लाकुडासह जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर दि २५ ऑगस्ट रोजी सायंकाळ दरम्यान सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांच्या गुप्त बातमीवरून वनविभागाचे कर्मचार शासकीय वाहनाने भोंनआमळा ता. नवापूर येथे जाऊन पाहणी केली असता संशयित वाहन (क्र.जी.जे.५, यु २६५० ) उभे असलेले दिसुन आले.त्यामध्ये अवैध रीत्या ताज्या तोडीचा पंचरास जळाऊ लाकुडमाल भरलेला आढळून आला. सदर घटनास्थळी वाहन मालक चालक किंवा लाकुडमालक आढळून आले नाही. यावेळी वाहन मुद्देमालासह जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणुन वनपाल आगार नवापूर यांचे ताब्यात देण्यात आले. जप्त वाहन व लाकुडमालाची अंदाजीत किंमत ५ लाख ५० हजार रूपये एवढी आहे.सदरील अवैध वाहतुकीच्या वनगुन्ह्याबाबत कारवाई डि.के.जाधव ,वनपाल वडकळंबी, वनरक्षक संजय बडगुजर, कमलेश वसावे, कल्पेश अहीरे , दिपक पाटील , संतोष गायकवाड यांनी केली असुन याबाबत वनपाल वडकंळबी यांनी प्रथम गुन्हा नोंद करून पुढील कारवाई वनविभाग नवापूर व चिंचपाडा करीत आहे.