नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे मशरूम कार्यशाळेचे उद्घाटन माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील गरबा चौक येथे दोन दिवसीय मशरूम शेती प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न झाली..मशरूम कार्यशाळेचे उद्घाटन माझी सभापती व जिल्हा परिषद सदस्य सी.के.पाडवी यांच्या हस्ते स्वर्गीय उत्तम जगतसिंग पाडवी यांचे फोटोला फुल व गुच्छ टाकून पूजा करण्यात आली.
राजवाडी गाव काठी येथे दोन दिवसीय मशरूम प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी सी.के.पाडवी म्हणाले की, सातपुडयात अभिनव प्रयोग राबवुन मशरूम करून त्याची चांगल्या प्रकारे मार्केटींग करीत मशरूम शेतीचे राजेंद्र वसावे यांनी आज वेगळे स्थान निर्माण केले आहे.व्यवयास करीत असतांना ते मशरूम शेतीबाबत अनेकांना मार्गदर्शन करीत आहेत. युवकांनीत्यांची प्रेरणा घेऊन चांगल्या कामात कार्यरत आहे. असे सी.के.पाडवी यांनी सांगीतले.
वेगवेगळे व्यवसाय स्पर्धा झाल्या असल्याने आजचे युवा पिढी भटकंती दिशाकडे वळत आहे.त्यांना सरळ मार्ग व कोणत्या रोजगारापासून आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो व व व्यावसायिक ट्रेनिंग महत्त्वाची आहे व मशरूम शेती ही एवढीच नाही तर आधुनिक क्षेत्रांमध्ये आपल्या योगदान द्यायला पाहिजे असे मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी गावातील व इतर पाड्यातील युवकांना सांगितले व प्रॅक्टिकली मशरूम बॅग मशरूम शेतीचे प्रेरणा देणारी लीलाताई वसावे यांनी बॅग बनवण्याची पद्धत युवकांना व गावातील लोकांना प्रात्यक्षिक दाखवले.
संदीप पाडवी रोशनी पाडवी यांना मशरूम युनिट आपल्या घरी तयार करण्यासाठी मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. व काठी येथील राजवाडी दसर्यामध्ये मशरूमचे स्टॉल लावण्यात येणार आहे याच्यात सातपुड्यातील बांधव व अधिकारी व नेत्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती दिली आहे.
या कार्यक्रमात तांत्रिक माहिती पिक संरक्षण तज्ञ,कृषी विज्ञान केंद्र पद्माकर कुंदे, विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार, विषय विशेषज्ञ उमेश पाटील, कृषी विज्ञान संशोधन सहाय्यक,निक्रा प्रकल्प अरुण कदम या तज्ञांनी थोडक्यात माहिती दिली .कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती सी.के.पाडवी भांगरापाणी आश्रम शाळेतील शिक्षक राजेंद्र नाईक, राजेंद्र पाडवी, शेरसिंग पाडवी, बहादुरसिंग पाडवी, गणपतसिंग पाडवी, सरदारसिंग वळवी, मशरूम शेतीचे उत्पादक महेंद्र पाडवी, भरत पावरा व गावातील शेतकरी व युवक या कार्यक्रमात उपस्थीत होते.








