नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प पुर्णतः अनुकूल असताना नियोजित प्रकल्प गुजरात येथे हलवण्यात आल्याने येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील भाजपा सरकारने वेदांत ग्रुपचा महाराष्ट्रातील उद्योग गुजरातच्या घशात घातला आहे. यामुळे राज्यातील तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा महाराष्ट्र विरोधी उद्योग चालविणार्या शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात गुजरातला उद्योगाचा पेटारा-महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा, द्या आमची रोजगाराची हमी-बंद करा गुजरात्यांची गुलामी, गुजरात तुपाशी-महाराष्ट्र उपाशी आदी घोषणा देत महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, शहराध्यक्ष नितीन जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष लल्ला मराठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड.अश्विनी जोशी, जिल्हा समन्वयक सिमा सोनगीरे, जिल्हा चिटणीस रंजना राजपूत, शहराध्यक्षा उषा वळवी, संगिता पाडवी, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, शहर संघटक जितू ठाकरे, कालू पहेलवान, राजा ठाकरे, महेंद्र कुवर, इकबाल शेख, छोटू कुवर, शुभम कुवर, रुपेश जगताप, पंकज पाटील, शामा पवार, बच्छाव नाना, लाला बागवान, अदनान मेमन, मिलिंद जाधव आदी उपस्थित होते.








