शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर करण्यात आले त्यातील 42 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीने दावा केला असून उर्वरित ग्रामपंचायतींवर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दावा केला जात आहे. मुबारकपूर व करणखेडा या ग्रामपंचायतीत दोघा उमेदवारांना सारखीच मते मिळाल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. दरम्यान बहुतांश ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती झाल्या आहेत विजय उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसह प्रचंड जल्लोष केला.
शहादा तालुक्यात 74 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यातील पुरुषोत्तमनगर मानमोड्या, कळसाडी काकरदा खुर्द, मोहिदा तह, सावखेडा या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 68 ग्रामपंचायतींसाठी काल दि.18 रोजी मतदान घेण्यात आले तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात करण्यात आली दरम्यान, उमेदवार व त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी पाहता पोलिसांनी मोहिदा चौफुली पासून ते तहसील कार्यालयापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात होता.
मतमोजणी आठ टेबल व नऊ फेऱ्यांमध्ये करण्यात आली निकाल जसजसे बाहेर येत होते तस तसे विजयी उमेदवार व त्यांचे समर्थक जल्लोष करीत होते.तर पराभूत उमेदवारांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसत होते सर्वच ग्रामपंचायतीमध्ये मध्ये लोकनियुक्त सरपंच व सदस्यांकरिता प्रचंड चुरस दिसून आली बहुसंख्य उमेदवार एक ते तीन मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत मुबारकपूर ग्रामपंचायतच्या प्रभाग दोनमध्ये पवार चित्राबाई रवींद्र व पवार प्रियदर्शनी कृष्णा यांना प्रत्येकी 87 मते व करणखेडा ग्रामपंचायतीत भिलावे दिलीप नवल व चव्हाण सुनील निंबा यांना प्रत्येकी 86 मते मिळाल्याने या दोन्ही ग्रामपंचायतीत ईश्वर चिट्ठी काढण्यात आली. त्यात अनुक्रमे प्रियदर्शनी कृष्णा पवार व दिलीप नवल भिलावे हे विजयी झाले ग्रामपंचायत निकाल जाहीर झाल्यानंतर
विविध राजकीय पक्षांनी दावेप्रति नावे सुरू केले आहेत त्यात भारतीय जनता पक्षाने 42 जागांवर दावा केला आहे.तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी देखील काही ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.त्यामुळे या ग्रामपंचायती नेमक्या कोणाच्या याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे व तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी मोठा बंदोबस्त साईनाथ केला होता








