Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी खडक्या येथील पीडितेच्या कुटुंबियांची घेतली भेट

team by team
September 20, 2022
in राजकीय
0
माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी खडक्या येथील पीडितेच्या कुटुंबियांची घेतली भेट
नंदुरबार |  प्रतिनिधी
        धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहितेच्या मृत्यु प्रकरणी तिच्या वडिलांच्या मागणी प्रमाणे सर्व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करीत पीडितेला न्याय मिळे पर्यंत काँग्रेस पक्ष  अन्याया विरुद्ध लढणारे आई वडील व सर्व ग्रामस्थांच्या सोबत आहे असा विश्वास माजी मंत्री व ऑल इंडिया काँग्रेस ट्रायबल कमिटीचे चेअरमन  शिवाजीराव मोघे यांनी दिला.
          धडगाव तालुक्यातील खडक्या येथे एका विवाहितेवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.त्या अनुषंगाने पोलिस व शव विच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्रुटी ठेऊन आरोपींना मदत केल्याचा आरोप करत मृत पीडितेला न्याय मिळणार नाही तो पर्यंत तिचा अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा वडिलांनी व ग्रामस्थांनी घेतला आहे त्यामुळे मृत विवाहितेचे शव अंत्यसंस्कार विना मिठात पुरुन ठेवला होता.सदर प्रकरण उजेडात आल्या नंतर शासनाने पुनश्च शव विच्छेदन करण्याचा आदेश दिला होता.
त्यानंतर तब्बल 43 दिवसांनंतर शव मिठातून बाहेर काढुन मुंबई येथे दुसऱ्यांदा शव विच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या आदेशान्वये काँग्रेस सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री आमदार ऍड.के.सी.पाडवी,आदिवासी सेल चे राष्ट्रीय समन्वयक व गुजरातचे आमदार आनंद चौधरी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर देत सांत्वन केले.दरम्यान शिवाजीराव मोघे,
आमदार के.सी.पाडवी यांनी  पीडितेला पुरलेल्या जागेची पाहणी करुन पुष्पांजली वाहुन श्रद्धांजली अर्पण केली.त्यानंतर कुटुंबियां सोबत चर्चा केली यावेळी पीडितेच्या वडिलांनी घडलेली सर्व घटना सांगितली.दरम्यान शिवाजीराव मोघे ,आमदार के.सी.पाडवी यांनी  काँग्रेस पक्ष कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगत पीडितेला न्याय मिळे पर्यंत आपणही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले.व कुटुंबीयांनी केलेले धाडस व पाठ पुराव्यामुळेच या प्रकरणाला वाचा फुटली असे सांगुन आपण कायद्याची लढाई लढू असे सांगितले.
        यावेळी पीडितेच्या वडिलांनी आपल्या बोली भाषेत हकीकत सांगितली या प्रसंगी आमदार के.सी.पाडवी यांनी दुभाषिकाची भूमिका निभावत शिवाजीराव मोघे यांना मराठीतुन  घटना समजावून सांगितली.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड.सीमा वळवी,माजी मंत्री ऍड.पद्माकर वळवी,  समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जि.प सदस्य विक्रम पाडवी,सुहास नाईक, माजी सभापती हारसिंग पावरा,धडगावचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग,

Next Post

शहादा तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींत विविध पक्षांचे दावे प्रतिदावे

Next Post
शहादा तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींत विविध पक्षांचे दावे प्रतिदावे

शहादा तालुक्यातील 68 ग्रामपंचायतींत विविध पक्षांचे दावे प्रतिदावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add