नंदुरबार l
तालुक्यातील आर्डीतारा येथे जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील आर्डीतारा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर महिला पोलिस कर्मचारी कार्यरत होत्या. यावेळी मतदान केंद्रावर संदिप सुता वळवी व सचिन सुता वळवी दोघे रा.आर्डीतारा ता.नंदुरबार हे आरडाओरड करीत होते.
यावेळी त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने महिला पोलिस कर्मचाऱ्याचा अंगावर संदिप वळवी हा धावून जात शिवीगाळ करीत लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग केला. तसेच सचिन वळवी यानेही शिवीगाळ व दमदाटी करीत दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३५३, ३५४, ५०९, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.








