Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अध्यात्मिक कार्याला पर्यावरणाची सांगड घालावी : नितीनदादा मोरे

team by team
September 19, 2022
in सामाजिक
0
अध्यात्मिक कार्याला पर्यावरणाची सांगड घालावी :  नितीनदादा मोरे
नंदूरबार l प्रतिनिधी
श्री.स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक केन्द्र दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून अध्यात्मिक कार्य हे मानवी जीवनात येणाऱ्या संकटावर व समस्येवर मात करून जीवन सुंदर व सुखमय होत असते या अध्यात्मिक कार्याला समाजसेवेची व पर्यावरणाची सांगड आवश्यक आहे असे वक्तव्य श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार जिल्हा अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संदर्भात श्री.स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित गुरुपीठ त्रंबकेश्वर चे पिठाधीश प पू गुरुमाऊली यांचे सुपुत्र व बाल संस्कार व युवा प्रबोधन विभाग प्रमुख नितीनदादा  मोरे यांनी व्यक्त केले.
         यापुढे ते म्हणाले श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणितच्या माध्यमातून अनेक दुखी व पीडित मानवी जीवनाचे प्रश्न सुटत आहेत या मार्गात 20 टक्के अध्यात्म व 80 टक्के परोपकार या सूत्रावर आधारित कार्य केले जाते या सूत्राप्रमाणेच अनेक समाज व पर्यावरण उपयोगी उपक्रमांपैकी प. पू. गुरुमाऊली यांनी एका वर्षात सव्वा कोटी महावृक्षारोपण व लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याच्या संकल्प घेतलेला आहे.
या संकल्प पूर्ततेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी व नागरिक कार्यरत झाले असून मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड महाराष्ट्रात झाली असून त्याचे संगोपन केले जात आहे त्यात खारीचा वाटा म्हणून नंदुरबार जिल्हा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून 21 हजार वृक्षारोपण व त्या वृक्षांचे संवर्धन होत आहे.
      आपली प्रकृती ही पर्यावरणावर आधारित आहे त्यासाठी वृक्षारोपण व लागवड ही काळाची गरज आहे भारतीय वृक्षांची लागवड करणे हेच पर्यावरणाला पूरक असे आहे.आंबा केळी वटवृक्ष औदुंबर तुळस यासारखी अनेक वृक्षांच्या संवर्धनाने मानवी प्रकृती व पर्यावरण चांगले राहते वृक्षांद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन संपूर्ण जगाला घडवावे दिंडोरी प्रणित ग्राम विभागांतर्गत प्रत्येक ग्रामीण भागात दरवर्षी किमान 500 वृक्ष रोपण व संवर्धन केल्यास सुजलांम सुफलाम भारत देश घडवण्यास मदत होईल वृक्ष संवर्धनासाठी टप्प्याटप्प्याने सेवा देण्याचे नियोजन करावे.
श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर सुरू आहे त्यात नंदुरबार जिल्हा हे अग्रगण्य आहे एका दिवशी पर्यावरण पूरक असे दहा हजार गणपती बनवायचा विश्वविक्रम असा उपक्रम राबविला आहे कोरोना काळात ऑनलाईन मार्गाने विविध उपक्रम  व सेवा देण्यात आल्यात.
         सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रम प्रसंगी नितीन भाऊ मोरे यांनी नंदुरबार जिल्हा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या अंतर्गत चालणारे ग्राम अभियानापैकी नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खूर्दे, आसाने, तसेच आश्रम शाळा कोळदे, शहादा व गुजरात राज्यातील सदगव्हाण येथे भेट देऊन वृक्षारोपण करून तेथील ग्राम अभियान चालविणारे सेवेकरी व ग्रामस्थांशी हितगुज केले या संपूर्ण अशा कार्यक्रमात सदर गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य व ग्रामस्थ तसेच सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार जिल्ह्यातील कार्यरत ग्राम अभियानातील ताई, भाऊ, काका व मावशी यांनी सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

‘थँक गॉड’ चित्रपटावर बंदी घाला; हिंदू देवतांची टिंगल सहन करणार नाही

Next Post

आमदार राजेश पाडवी तापी जिल्हा निवडणूक प्रभारी

Next Post
आमदार राजेश पाडवी तापी जिल्हा निवडणूक प्रभारी

आमदार राजेश पाडवी तापी जिल्हा निवडणूक प्रभारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add