Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत माणिकरावदादांवर साश्रूनयनानी अंत्यसंस्कार

team by team
September 19, 2022
in राजकीय
0
हजारो नागरिकांच्या उपस्थितीत माणिकरावदादांवर साश्रूनयनानी अंत्यसंस्कार
नवापूर l प्रतिनिधी
 नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा निवडून येऊन भारतीय संसदेत मतदार संघ प्रतिबिंबित करणारे व नंदुरबार जिल्ह्याची देशभरात ओळख देणारे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव होडल्या गावित (वय ८८) यांचे दि. 17 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने नाशिक येथे निधन झाले होते. दि. 18 रविवार रोजी  सुमाणीक फार्म हाऊसवर त्यांच्यावर हजारोंच्या नागरिकांच्या उपस्थितीत साश्रूनयनानी अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळपासूनच स्व. माणिकराव गावित यांच्या  राहत्या घराजवळ पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी नवापूर शहरासह नाशिक धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील विविध राजकीय समाजिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संखेने गर्दी केली होती.तत्पूर्वी पोलिसांनी पहिली मानवंदना दिली.यावेळी उपस्थित महिला भगिनींनी श्री.दत्त बावनी म्हटली दुपारी ११.४५ वाजता   फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरवर  त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी माजी आमदार सौ. निर्मला गावित, माजी जि. प. अध्यक्ष भरत गावित, श्रीमती जयश्री गावित, सौ.नीता वसावे, धनंजय गावित,मानस गावित,  नयना गावित, हर्शल गावित, गिरीश गावित यांच्यसह परिवाराने मोठा आक्रोश केला.
रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण मार्गक्रमणावर दादांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गल्लोगल्लीत माता भगिनी बंधू लहान लहान बालके अंतिम दर्शनासाठी उभे होते पार्थीवावर पुष्पवृत्ती करीत होते.यावेळी दादासाहेब  अमर रहे,जबतक सुरज चांद रहेगा तब तक दादाका नाम अमर रहेगा,अशा भावनिक घोषणा देत  शहरातील गुजर गल्ली,दत्त मंदिर,शिवाजी रोड,कुभारवाडा,शीतल सोसायटी,महात्मा गांधी पुतळा,लिमडावाडी,लाईट बाजार,डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड,देवलफळी मार्गे आयटीआय रोड वरून त्यांच्या सुमाणिक फार्म हाउस येथे अंत्य यात्रा पोहचली.
यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत,माजी मंत्री सुरूपसिंग नाईक आ. शिरीषकुमार नाईक,आमदार जयकुमार रावल,आमदार सुधीर तांबे,आमदार राजेश पाडवी,आमदार मंजुळा गावीत,आमदार आमश्या पांडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी,डी. एस.अहिरे,रामकृष्ण पाटील, माजी खासदार बापू चौरे,भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी,प्रांताधिकारी मीनल करणवाल जिल्हा पोलीस अधिकारी पी.आर. पाटील,तहसीलदार मंदार कुलकर्णी,नगराध्यक्षा सौ. हेमलता पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी ,जि.प.शिक्षण अजित नाईक, सभापती मनोज रघुवंशी ,नागेश पाडवी,श्याम सनेर,सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील,दिलीप नाईक,
रमेश श्रीखंडे,सुहास नटावदकर,शालिनी नटावदकर,मीराबेन चोखावाला,आर आर अग्रवाल,धुळे जि पचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते, नाईक,दीपक नाईक,विनोद नाईक,कांतीलाल टाटीया,विलास सैंदाणे,सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ,पोलीस निरीक्षक अर्जुन पटले पोलीस निरीक्षक भरत जाधव आदीसह गुजरात राज्याच्या विविध क्षेत्रातील नागरिक स्थानी स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी व माणिकराव गावित यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी सुमाणिक फार्म हाऊस येथे शाम सनेर,आ.डॉ.सुधीर तांबे,आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावीत, आ.जयकुमार रावल,आ.शिरीष नाईक,आ.राजेश पाडवी, विजय चौधरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
ग्रामपंचायत सदस्य ते नऊ वेळा संसद सदस्य, टाॅप टेन खासदार, लोकसभेचे सभापती, केंद्रीय मंत्री अश्या विविध पदांवर विराजमान राहूनही जनसामान्यांमध्ये समरस होऊन आलेल्या प्रत्येकाचे काम करुन त्यास समाधानी करण्यासाठी माणिकराव गावीत यांनी केलेले प्रयत्न, त्यांनी केलेली लोककल्याणकारी कामे व त्यासाठी वाहिलेले जीवन यासारख्या स्मृतींना मान्यवरांकडुनन श्रद्धांजली वाहतांना उजाळा देण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी विभागाकडून पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस पथकाकडून सात  बंदुकीच्या तीन राउंड २१ फैरी झाडण्यात येऊन सलामी देण्यात आली. चंदनाचे लाकूड व शेणाच्या उपल्यांमध्ये ठेवलेल्या त्यांचे पार्थिवास पुत्र भरत गावीत यांनी अग्नीडाग दिला. उपस्थित सर्वांनी सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली.
   शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने आपली सर्व प्रतिष्ठाने शंभर टक्के बंद ठेऊन आपल्या लोकनेत्यास श्रद्धांजली अर्पण केली. भाजीपाला विक्री, वाहन व्यवहार औषधी दुकाने सारखी प्रतिष्ठान देखील बंद ठेवण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

हत्याराचा धाक दाखवून सुवर्ण व्यापार्‍यास लुटणार्‍या गुन्ह्यातील एकाला गुजरात राज्यातुन अटक

Next Post

सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

Next Post
सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026
गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

गांजासह पाच लाखाचा मुद्देमला जप्त; दोघांना घेतले ताब्यात

May 16, 2026
जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भर

May 16, 2026
नंदुरबार तालुक्यातील गावांना  माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

नंदुरबार तालुक्यातील गावांना माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते पाणी टँकरचे वितरण

May 16, 2026
भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add