नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील वडवड ते उमर्दे दरम्यान सराफाला नऊ लाख ७६ हजार ७२० रुपयांत
लुटल्याप्रकरणी अज्ञात तीन व्यक्तीविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपर्ली, ता. नंदुरबार येथे व्यवसाय करणारे व नंदुरबार येथे राहणारे रुपेश सुमनलाल सोनार हे शुक्रवारी सायंकाळी कोपर्ली येथून नंदुरबारकडे येत असतांना त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून तीन अज्ञात लोकांनी त्यांच्या वाहनाला दुसरे वाहन आडवे लावले.
त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण नऊ लाख ७६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी शनिवारी पहाटे चार वाजता रुपेश सोनार यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








