नंदूरबार l प्रतिनिधी
स्त्रियांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा व आत्मविश्वास वाढीस लागावा म्हणून नंदुरबार मध्ये प्रथमच गार्गी ग्रुप प्रमुख व लायन्स फेमिना अध्यक्ष शीतल चौधरी(ब्रँड अँबेसिडेर पनाचे रन वे २०२२)यांनी या स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात केले होते त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी खास प्रमुख पाहुणे म्हणून सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचे सह अभिनेते व मॉडेल विशाल कपुर,जुरी अभिनेत्री व मॉडेल स्वाती लंके, जुरी अभिनेते व मॉडेल अभिजित म्हात्रे आदी उपस्थित होते.
विविध पातळ्यांवर रंगत गेलेल्या सोहळ्यात अनेक नृत्यही सादर केले गेले.या स्पर्धेत मिसेस नंदुरबार स्पर्धेत प्रथम वर्षा सिंगल, द्वितीय दीपिका वळवी,तृतीय प्रियांका सोनार ठरल्या.तर मिसेस टाइमलेस ब्युटी कमल जयस्वाल, मिसेस फिट अँड ऍक्टिव प्रगती चौधरी, मिसेस ग्लॅमरस पूनम वळवी,या विजेत्या ठरल्या.
याच बरोबर मिस नंदुरबार स्पर्धेत प्रथम खुशी कटारिया, द्वितीय अनुष्का वळवी, तृतीय जान्हवी पाटील ठरली.तसेच मोस्ट फोटोजेनिक खुशी भावसार, मिस चर्मिंग स्माईल साक्षी सोनार, मिस स्टाईल आयकॉन मयुरी अहिरे ठरली.या स्पर्धेचे यशस्वीतेसाठी कल्याणी दातीर, दिव्या रघुवंशी,यांचेसह लायन्स क्लब नंदुरबारचे अध्यक्ष सतीश चौधरी व सदस्य, लायन्स फेमिना क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.








