नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार येथील जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष कै दिलीपराव मोरे यांच्या २२ व्या स्मृति दिना निमित्त जिजामाता शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक परिवारातर्फे जिजामाता महाविद्यालयातील त्यांच्या समाधी स्थळी अभिवादन कार्यक्रम आज सकाळी घेण्यात आला.

कै.मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज येथील जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या त्यांच्या समाधी स्थळी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला व त्यांना श्रद्धांजली देण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते महेश तपासे, जिजामाता शिक्षण संस्थेचे अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, सचिव डॉ.अभिजीत मोरे, उपाध्यक्ष डॉ.विक्रांत मोरे, राऊ मोरे, यांच्यासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी तसेच संस्थेच्या विविध शाखांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








