नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कालिबेल ते पाडवी डांबरी कालीबेल गावाजवळ गुरे चारण्यास अटकाव होईल म्हणुन वनरक्षकास हाताबुक्यांनी मारहाण करुन नकाशा काढण्याचे जीपीएस मशिन फेकून व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील भगदरी येथील वनरक्षक हिंमतसिंग तिज्या तडवी हे कालीबेल ते पाडवी डांबरी रस्त्यावरील कालीबेल गावाजवळ रोप लागवडीसाठी जीपीएस मशिनमध्ये नकाश काढत होते. यावेळी धिरसिंग मारग्या वळवी रा.धडगाव व स्वप्निल उर्फ बंटी भास्कर वळवी रा.मोजरा ता.धडगाव यांनी तूम्ही रोपे लावली तर गुरे चारू देणार नाही असे सांगत विरोध केला.यावेळी हिंमतसिंग तडवी यांनी दोघांना झाडे लावण्याचा शासनाचा उपक्रम आहे त्यात तुम्ही अडथळा आणू नका असे सांगितले.
याचा राग आल्याने हिंमतसिंग तडवी यांना धिरसिंग वळवी व स्वप्निल वळवी यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच नकाशा काढण्याचे जीपीएस मशिन हिसकावून जमिीवर फेकून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत हिंमतसिंग तडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राहूल पाटील करीत आहेत.








