Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान : नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, बाजार भरवण्यास बंदी

team by team
September 12, 2022
in राज्य
0
सावधान : नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित, बाजार भरवण्यास बंदी

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यात तसेच धुळे व जळगाव जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने खबरदाराची उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्यादृष्टीने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम,2009 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत नंदुरबार जिल्हा ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

 

लम्पी स्किन डिसीज रोग नियंत्रण तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची, ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात येत असून बांधीत राज्यातून खरेदी- विक्रीच्या उद्देशाने होणारी वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे

 

याशिवाय गोजातीय प्रजातीची बाधीत असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधीत झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.

 

गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आली आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जनावरांच्या जत्रेत प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधीत झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात येत असून गुजरात, मध्यप्रदेश व बांधित जिल्ह्यांच्या सीमाभागातील गावातील जनावरांना गोट पॉक्स लस उपलब्ध करुन त्याचे तात्काळ लसीकरण करावे.

सदर आदेशाचे अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप निबंधक, कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी संस्था व अन्य अनुषंगीक प्रशासकीय विभागाने आदेशाचे पालन करावे असेही आदेशात नमूद केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चायनीज फटक्यासह 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी

Next Post

वनरक्षकास मारहाण केल्याने दोघांविरूध्द गुन्हा

Next Post
महिलेच्या अंगावर टरपेंटाईन फेकले, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वनरक्षकास मारहाण केल्याने दोघांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add