शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात डीबीटी स्टार काॅलेज योजने अंतर्गत आऊटरीच उपक्रम अंतर्गत कोचरा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयात आऊटरीच उपक्रम राबविण्यात आला.
त्या अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कोचरा ता. शहादा मधील 10 वीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना आमंत्रित करण्यात आले होते. आश्रम शाळेतील 34 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र,प्राणिशास्त्र व रसायनशास्त्र विभागातील प्रयोग शाळांना भेटी दिल्या व विविध उपकरणांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सोबतच काही प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविण्यात आले.या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना सामावून त्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध नसलेल्या शैक्षणिक उपकरणांची व प्रयोगांची ओळख करून विद्यार्थ्यांचा शिक्षणात सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.सदर उपक्रमांतर्गत वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.निलेश आठवले,प्रा.महेश जगताप,प्राणिशास्त्र विभागातील प्रा.सतीश भांडे,प्रा.योगेश वासू रसायनशास्त्र विभागातील प्रा.अनिल बेलदार,प्रा.उजगरे, प्रा.जगदीश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
उपक्रमासाठी विभागप्रमुख प्रा.एस.के.तायडे, प्रा.यु.एम.जाधव, प्रा.आर.एम.चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक पुष्पा वसावे,सुरज पटले,देविदास वसावे व महाविद्यालयातील प्रयोगशाळा परिचर अशोक पाटील,मणीलाल पाटील, योगेश यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एस. पाटील,उपप्राचार्य डॉ..एम.के.पटेल.डाॅ.आर. झेड.सय्यद.यांनी कौतुक केले.
सदर उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.








