Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासनातर्फे राज्यात स्मार्ट प्रकल्पासाठी निवड झालेल्यांमध्ये वनश्री शेतकरी कंपनी अव्वल : अध्यक्ष अभिजीत पाटील

team by team
September 12, 2022
in राजकीय
0
शासनातर्फे राज्यात स्मार्ट प्रकल्पासाठी निवड झालेल्यांमध्ये  वनश्री शेतकरी कंपनी अव्वल : अध्यक्ष अभिजीत पाटील

शहादा-

दिवसेंदिवस सहकार तत्वावरील प्रकल्प बंद होत चालले आहेत. परंतु वनश्री शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे शेतकर्‍यांच्या हिताचे प्रकल्प राबवले जात आहेत. राज्यात स्मार्ट प्रकल्पासाठी काही कंपन्या शासनाने सिलेक्ट केल्या त्यात वनश्री अव्वल स्थानी आहे. यावर्षी दीड लाख क्विंटल कापूस खरेदीचे नियोजन असून शेतकरी व सभासद हितासाठी कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी चांगल्या प्रतीचा अधिकाधिक कापूस वनश्री जिनिंगला विक्रीसाठी आणावा,असे आवाहन वनश्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले.

 

 

नांदरखेडा (ता. शहादा) येथील वनश्री जिनिंग मध्ये वनश्री शेतकरी उत्पादक कंपनीची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी श्री पाटील बोलत होते.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोंडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे शहादा शाखाप्रमुख शशिकांत गायकवाड, रमेश बाबू शंकर चौधरी ,योगेश पटेल, दिनेश पाटील, शिवाजी पाटील, दगडू पाटील, अनिल पाटील, यशवंत पाटील आदींसह संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते.

 

 

श्री पाटील म्हणाले की, वनश्रीतर्फे गेल्यावर्षी प्रथमच कापूस खरेदी करण्यात आली त्यात चुका झाल्या असतील परंतु त्यातून शिकायला मिळाले. खेळते भांडवल कमी असल्याने अडचणी आल्या तरीही प्रत्येक शेतकर्‍याला पै अन पै अदा केली. कुठल्याही शेतकर्‍याचे पैसे बाकी ठेवले नाही. शहाद्यात सुरू असलेली माती परीक्षण लॅब लवकरच नांदरखेड्यात आणली जाईल. अनुदानासाठी प्रकल्प स्थापन केले जात नसून शेतकरी हितासाठी काम सुरू आहे. शासनाने कामाची दखल घेतली व अनुदान मंजूर केले.

 

 

 

अहवाल वाचन रमेश पाटील यांनी केले त्यात त्यांनी कापूस खरेदी, तसेच कंपनीच्या नफा-तोटा ताळेबंद वाचन केले. त्याचबरोबर कंपनीची स्थावर मालमत्ताही विशद केली.यावेळी राजेंद्र दहातोंडे, शशिकांत गायकवाड, हरी पाटील, प्रदीप लाटे आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे सदस्य, पदाधिकारी यांसह वनश्रीचे सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

विमल गुटख्याची पुडी देण्याघेण्याच्या वादातून दोघांना मारहाण

Next Post

कोचरा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन

Next Post
कोचरा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन

कोचरा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add