नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव शहरातील एका किराणा दुकानाजवळ विमल गुटख्याची पुडी देण्याघेण्याच्या वादातून दोघांना मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील परमाडवाडा येथील हेमंत राजेंद्र पाडवी व आकाश बारद्या पावरा यांच्यात विमल गुटख्याची पुडी देण्याघेण्यावरुन वाद झाला. या वादातून हेमंत पाडवी यांना आकाश बारद्या पावरा, सचिन बारद्या पावरा दोघे रा.वडफळ्या ता.धडगाव व कोहीनूर रा.जुने तहसील कार्यालय, धडगाव यांनी काठीने मारहाण केली. तसेच हेमंत पाडवी यांचे जावई करण पावरा यांना देखील हाताबुक्यांनी मारहाण केली.
याबाबत हेमंत पाडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.शशिकांत वसईकर करीत आहेत.








